YOUTUBE LIVE Stream | VIRAL IN INDIA | Marathi News Channel |
EXCLUSIVE ON VIRAL IN INDIA | LIVE NEWS
ShivSena Pakshampramukh Uddhav Thakare Live Speech At Beed
उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा....
या दौऱ्यात बीड, जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावात शिवसेना मदत मोहीम सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असं उद्धव यांच्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे. या मदत मोहिमेत अन्नधान्य, पशूखाद्य आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप होणार आहे.
तसंच शिवसेनेनं राज्य सरकारने केलेल्या कर्जमुक्तीची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली आहे. याची चौकशी करणारा गावागावातील सर्वेही केला आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंतिम लढाईचं रणशिंग शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या शेतकरी मेळाव्यात फुंकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्याची सुरुवात बीड जिल्ह्यातील माळसजवळा या दुष्काळग्रस्त गावातून झाली. याच गावातील दुष्काळग्रस्त बळीराजाच्या जनावरांसाठी पशुखाद्य वाटप शिवसेनेकडून केलं गेलं.
शिवसेनेच्या दुष्काळ दौर्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याच माळसजवळा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मराठवाडयात यंदा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मात्र, शिवसेना दुष्काळग्रस्त जनतेच्या सोबत आहे. सरकार दुष्काळ निवारण विषयक विविध विविध उपाय योजना राबवत आहे. त्याबरोबर दुष्काळी जनतेच्या पाठीशी शिवसेना खंबिरपणे उभी आहे. मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी शिवसेना वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. याची सुरुवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ९ जानेवारीला बीडमध्ये होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत शंभर ट्रक चारा मराठवाड्यातील पशुधन जगवण्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हाराष्ट्रातील विविध भागात पाऊस कमी झाल्याने यंदा पुन्हा एकदा दुष्काळ पडला आहे. या दुष्काळी संकटाचा पक्ष, संघटना विरहित सर्वांनी मिळून एकत्र येत मुकाबला केला पाहिजे. त्यामुळे शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्या समाजासोबत राहिला आहे. या दुष्काळी स्थितीमध्ये ही शिवसेना या बांधवाच्या पाठीशी राहणार आहे. शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा दुष्काळी जनतेसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाकी सर्व कामे बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शासनाच्या माध्यमातून उपाययोजना सुरू राहतील. मात्र, सरकारसोबत आता शिवसेना मदतीचा हात पुढे करणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीत दोन हजार मुलामुलींचे विवाह शिवसेनेने लावले आहेत. हजारो बांधवाना मोफत धान्य पुरवले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले. दोनशे जेसेबीच्या माध्यमातून नदीनाले खोलिकरण व रुंदीकरण करत जलसंधारण कामे केली. मात्र, यंदा पाऊस पडला नाही. त्यामुळे हे पाणी जमिनीत मुरलेच नाही. पुन्हा दुष्काळ आवासून उभा ठाकला आहे. शासनाएवढेच काम शिवसेनेने हाती घेतले आहे. हे दुष्काळी जनतेसाठी शिवसेनेच्या मदतीचा उपक्रम ९ जानेवारीपासून बीड येथून सुरू होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नऊ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये दुष्काळाची पाहणी ते करणार आहेत. दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधणार आहेत. येथे येताना शंभर ट्रक पशुखाद्य घेऊन येऊन बीडमध्ये ३० ट्रक खाद्य वाटप केले जाणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख सुनील धांडे, चंद्रकांत नवले,यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते .
☛ Please Like, Share, Support & Subscribe Viral In India Channel
► YouTube : / viralinindia1
► Facebook : / viralinindia
► Write us : [email protected]
This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.